एक्स्प्लोर

चंद्रपूरच्या लेग स्पिनरची चर्चा, थेट राष्ट्रीय शिबिरात निवड

सध्या लेग स्पिन गोलंदाजांसाठी सुगीचे दिवस आहेत. त्याच सुमारास भारतातल्या अंडर नाईन्टिन क्रिकेटमध्ये रोहित दत्तात्रय या लेग स्पिनरच्या नावाची चर्चा होऊ लागली.

चंद्रपूर : सध्या लेग स्पिन गोलंदाजांसाठी सुगीचे दिवस आहेत. त्याच सुमारास भारतातल्या अंडर नाईन्टिन क्रिकेटमध्ये रोहित दत्तात्रय या लेग स्पिनरच्या नावाची चर्चा होऊ लागली. चंद्रपूरच्या या गुणी लेग स्पिनरनं यंदाच्या मोसमात अशी काय कामगिरी बजावली, की धर्मशालातल्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी त्याची निवड झाली. एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या कूचबिहार करंडकात रोहित दत्तात्रयच्या लेग स्पिननं यंदा धुमाकूळ घातला. त्यानं नऊ सामन्यांमध्ये तब्बल ३५ फलंदाजांना माघारी धाडून बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. रोहितची हीच कामगिरी विदर्भाच्या कूचबिहार करंडकातल्या यशात मोलाची ठरली. साहजिकच बीसीसीआयच्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी रोहित दत्तात्रयची निवड झाली आहे. चंद्रपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहितला बालपणापासून क्रिकेटची आवड होती. पण चंद्रपुरात क्रिकेटची पायाभूत सुविधा नसल्यानं, रोहितला क्रिकेट खेळू द्यावं की नाही याबाबत त्याच्या पालकांच्या मनात शंका होती. पण रोहितनं आपल्या खेळात सातत्य ठेवून आपल्या पालकांचा विश्वास जिंकला. रोहितनं वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या थोरल्या भावाचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रोहितची खेळातली गती पाहून त्याची पहिल्यांदा विदर्भाच्या अंडर थर्टिन संघात निवड झाली. त्यानं राजसिंग डुंगरपूर करंडकातल्या पदार्पणात १० विकेट्स काढून आपली निवड सार्थही ठरवली. विदर्भानं विजय मर्चंट करंड जिंकला, त्या वेळी रोहितनं आठ विकेट्स काढून अंतिम सामन्याला कलाटणी दिली होती. यंदा अंडर नाईन्टिन वयोगटातही त्यानं आपल्या लेग स्पिनचा करिश्मा दाखवून दिला. रोहित सध्या चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावीला आहे. लेग स्पिनर म्हणून त्याची प्रतिभा आणि त्याचा विनयशील स्वभाव यामुळं तो प्रशिक्षकांचाही लाडका आहे. गुगली हे त्याच्या भात्यातलं महत्त्वाचं अस्त्र असल्याचं प्रशिक्षकांचं म्हणणं आहे. रांचीसारख्या छोट्या शहरातून उदयास आलेल्या महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाभलेल्या यशानं गावागावातल्या मुलांना एक नवा आत्मविश्वास मिळवून दिला. ‘हम किसी से कम नही’ असं बजावून सांगणारा हा आत्मविश्वासच रोहित दत्तात्रयसारख्या मुलांना आणखी पुढं घेऊन जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Embed widget