एक्स्प्लोर

पाकिस्तान की इंग्लंड, फायनलमध्ये कोण?

इंग्लंड : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत यजमान इंग्लंडचं पारडं जड मानलं जात आहे. याचं पहिलं कारण इंग्लंडचा संघ समतोल असून, त्यांनी साखळीत तिन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंडचं पारडं जड असण्याचं दुसरं कारण इंग्लंड मायदेशात खेळत आहे. 2015 सालच्या वन डे विश्वचषकात इंग्लंडवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली होती. पण गेल्या दोन वर्षांत इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये कात टाकली आहे. इंग्लंडनं मायदेशातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा 4-1 असा धुव्वा उडवला. याच मालिकेतल्या ट्रेन्ट ब्रिजच्या वन डेत इंग्लंडनं तीन बाद 444 धावांचा नवा विश्वविक्रम रचला होता. बेन स्टोक्ससारखा जगाला हेवा वाटावा असा अष्टपैलू वीर आज इंग्लंडच्या ताफ्यात आहे. जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असा ज्यो रूटही इंग्लंडच्या संघात आहे. त्याशिवाय अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांच्याकडेही इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्याची ताकद आहे. जेक बॉल, लियाम प्लन्केट आणि मार्क वूड यांच्या समावेशानं इंग्लंडच्या हाताशी धारदार वेगवान आक्रमण आहे. धोकादायक पाकिस्तान इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीतला सर्वात धोकादायक हा पाकिस्तानच आहे. कारण पाकिस्तानचं आक्रमण इतकं धारदार आहे की, प्रतिस्पर्धी संघावर कोणत्याही क्षणी बाजी उलटवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मोहम्मद आमिर, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ असे चार चार वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या ताफ्यात आहेत. सलामीच्या सामन्यात टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ चवताळून उठला आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांवर मिळवलेले विजय हा संघ किती ताकदीचा आहे, हेच दाखवणारे आहेत. इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानची फलंदाज कमकुवत आहे. पण सलामीच्या फखर झमानच्या यशस्वी पदार्पणानं पाकिस्तानला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. अझर अली, सरफराज अहमद, मोहम्मद हफिज आणि शोएब मलिक यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget