PV Sindhu lost to Tai Tzu Ying: भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील (BWF World championships 2021) आव्हान संपुष्टात आलंय. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून 17-21, 13-21 अशा फरकानं पराभव पत्करावा लागलाय.
सिंधूनं गुरुवारी थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा सरळ गेममध्ये पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधुनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगचा पराभव करून उपांत्य पूर्व स्पर्धेत धडक दिली होती. या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूनं चोचुवँगवर 21-14, 21-18 अशी सरळ सेटमध्ये मात केली होती. सहाव्या मानांकित सिंधूचा पॉर्नपावीविरुद्धच्या आठ सामन्यांमधील हा पाचवा विजय होता.
इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धा
पी.व्ही सिंधुला इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलँडच्या रेचानोक इंतानोननंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोननं तिला 54 मिनिटात 15-21, 21-9 आणि 21-14नं पराभूत केलं होतं.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक हुकलं
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमघध्ये सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळं तिचं सुवर्णपदक हुकलं होतं. तिला दुसऱ्या स्थानावर रौप्यपदकासह समाधान मानावं लागलं होतं. सिंधूला दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने मात दिली होती. पीव्ही सिंधू आणि एन सेयुंग यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी होत होता. एन सेयुंगने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. ज्यामुळे सिंधूला सामन्यात आगमन करण्याचा वेळ मिळालाच नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-