World Masters Athletics Championship : 'Age is Just Number' या इंग्रंजी वाक्याचा प्रत्यय कधी कधी सत्यात येतो, हाच प्रत्यय हरियाणाच्या 94 वर्षीय भगवानी देवी यांनी आणून दिला आहे. या आजीबाईंनी फिनलँडच्या टेम्परे येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये (World Masters Athletics Championship) सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांना गवसणी घातली आहे. ज्या वयात अनेकांना चालायलाही अवघड पडतं अशामध्ये भगवानी देवी यांनी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. तर शॉटपुट खेळात कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.





कशी केली कामगिरी?


या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भगवानी देवी यांनी 100 मीटर स्प्रिंट इव्हेंटमध्ये 24.74 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक मिळवलं. तर दुसरीकडे शॉटपुट म्हणजेच गोळा फेकमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी भगवानी देवी यांनी केलेल्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचा तिरंग्याच्या रंगाच्या जर्सीमधील मेडलसोबतचा फोटो व्हायरल हो असून मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सनेही ट्वीटकरत भगवानी देवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.   



हे देखील वाचा-