Novak Djokovic :  विम्बल्डन 2022 (Wimbledon 2022) या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे. अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकने विजय मिळवत जेतेपद नावे केलं आहे. 



जोकोविचने रचला इतिहास


जोकोविचनं मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ज्यानंतर आता आज त्याने विजय मिळवत विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेचंही जेतेपद पटकावत सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे सलग टौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिवाय जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद देखील झाली आहे. ज्यामुळे त्याने रॉजर फेडरर ज्याच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम आहेत, त्याला मागे टाकलं आहे. या यादीत स्पेनचा राफेल नदाल 22 ग्रँड स्लॅमसह अव्वल स्थानी आहे.



महिला एकेरीत एलेना रिबाकिना विजयी


विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये (Wimbledon 2022) महिला गटात कझाकिस्तानच्या (kazakhstan) एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरला (Ons Jabeur) मात देत विजय मिळवला आहे. चुरशीच्या झालेल्या सामन्यात एलेनाने (Elena Rybakina) ओन्स जेबुरला 3-6, 6-2 आणि 6-2 अशा तीन सेट्समध्ये पराभूत करत विम्बल्डन महिला एकेरीचे (wimbledon 2022 Women singles) विजेतेपद पटकावले आहे. 23 वर्षाच्या वयात एलेनाने हा खिताब पटकावल्यामुळे संपूर्ण टेनिस जगतात तिचे कौतुक होत आहे.विशेष म्हणजे कझाकिस्तानकडून हा खिताब पहिल्यांदाच कोणत्यातरी खेळाडूने मिळवला आहे. 


हे देखील वाचा-