एक्स्प्लोर

BCCI मधील सुधारणेच्या अतिरेकामुळे क्रिकेटचा नाश होईल : पवार

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अॅड.नीला गोखले आणि अॅड.कामाक्षी मेहलवार यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करुन, कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीविषयी भूमिका स्पष्ट केली.

नवी दिल्ली : प्रशासकीय समिती बीसीसीयमध्ये सुधारणेचा अतिरेक करत असून त्यामुळे क्रिकेटचा नाश होईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीवर आरोप करताना पवार म्हणाले की, या समितीने लोढा कमिटीच्या शिफारशींच्याही पुढे जात बीसीसीआयच्या संविधानाचा मसुदा तयार केला आहे. क्रिकेटमध्ये दिलेल्या आपल्या योगदानाचा शरद पवारांनी उल्लेख केला. देशात क्रिकेट प्रशासनाचा विकास आणि त्याच्या कामकाजात ज्येष्ठ प्रशासकांनीही उल्लेखनीय योगदान केलं आहे. बोर्डाच्या उदयापासून त्यात होणाऱ्या बदलांच्या साक्षीदारांमध्ये मीही आहे, असं पवारांनी सांगितलं. शिवाय आपल्याच नेतृत्त्वात बोर्डाने पहिल्यांदा माजी खेळाडूंसाठी पेन्शन स्कीम लागू केली. तसंच महिला क्रिकेटही बीसीसीआयच्या अंतर्गत आणलं. आपल्याच कार्यकाळात जगातील सर्वाच लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची संकल्पना तयार करण्यात आली, असंही पवारांनी सांगितलं. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अॅड.नीला गोखले आणि अॅड.कामाक्षी मेहलवार यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करुन, कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीविषयी भूमिका स्पष्ट केली. केवळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्यानेच बीसीसीआय चौकशी आणि आरोपांच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळेच बीसीसीआयमध्ये पारदर्शक कारभार होत नाही, अशी लोकांची धारणा बनली आहे. एन.श्रीवासन यांनी बोर्डात आपल्या जावयाची वर्णी लावल्याने या धारणेला आणखी बळ मिळालं, असं पवारांनी अर्जात म्हटलं आहे. पवार म्हणाले की, अशा हितसंबंधांपासून वाचण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली. पण या समितीने बोर्डाच्या संविधानाचा मसुदा तयार करताना लोढा समितीने सुचवलेल्या शिफारशीही हद्दपार केल्या, ज्या सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलै रोजी मान्य केल्या होत्या. संविधानातील मसुद्यात एक राज्य एक मतच्या तरतुदीमुळे राज्यात केवळ एकच क्रिकेट असोसिशन असेल, दुसरी असोसिएशन बनवता येणार नाही. पण हे बीसीसीआयची सदस्य असलेल्या असोसिएशनच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चा दाखला देताना शरद पवार म्हणाले की, "एमसीएचं क्रिकेटमधील योगदान उल्लेखनीय आहे. एमसीएने देशाला अनेक नामवंत खेळाडू आणि पायाभूत सुविधाही दिल्या आहेत. त्यामुळे 'एक राज्य एक मत'च्या नावावर  एमसीएकडून मतदानाचा अधिकार हिसकावून घेतल्याने बोर्डाचं कार्य पारदर्शक होणार नाही." "असोसिएशनची स्थापना करणं हा मूलभूत अधिकार आहे, बोर्डाच्या अनुच्छेद 19 (1) (C)मध्ये नमूद आहे. प्रशासकीय समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा आणि सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशीमध्ये विरोधाभास आहे. जर लोढा समितीच्या शिफारशी मान्य केल्या जातात, तर असोसिएशनवर अशाप्रकारची बंदी घालणं शक्य नाही, असंही पवारांनी नमूद केलं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने  लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोढा समितीच्या शिफारशीनुसार वयाची 70 वर्ष ओलांडलेला व्यक्ती एखाद्या असोसिएशनचा अध्यक्ष असू शकत नाही. यानंतर शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Embed widget