Cricket News : कोरोना महामारीच्या काळातही बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा मोसम यशस्वी करुन दाखवला आहे. आयपीएल 2020 संपल्यानंतर आता बीसीसीआयच्या वतीने आयपीएलचा 14 वा मोसम यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, पुढील वर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 9 संघ असण्याची शक्यता आहे. बीसीसीआय याबाबत विचार करत आहे. जर असं प्रत्यक्षात घडलं तर पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलचा मेगा ऑक्शन पाहायला मिळेल.
'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल 2021 मध्ये नवीन संघ जोडण्याचा विचार करीत आहे. हा संघ गुजरातचा असू शकतो. जर बीसीसीआयने हे केले तर आयपीएलच्या लिलावात सर्व संघातील खेळाडूंमध्ये मोठा बदल दिसू शकेल. विशेष म्हणजे आयपीएलचा लिलाव नेहमी डिसेंबर महिन्यात होत असतो. मात्र यावेळी कोरोनाच्या साथीमुळे आयपीएल स्पर्धेलाच उशीर झाला आहे. त्यामुळे पुढच्या हंगामाचा लिलाव जानेवारी 2021 मध्ये होऊ शकतो.
IPL 2020 : ...म्हणून विजेत्या मुंबई इंडियन्सला मिळाली बक्षिसाची अर्धीच रक्कम!
अलीकडेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केले की, आयपीएल 2021 भारतात आयोजित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. पण त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले होते की जर भारतात आयपीएल स्पर्धा घेणे शक्य झालं नाही तर युएई हा दुसरा पर्याय असेल.
IPL 2020 : ट्रेंट बोल्टची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसचा विकेट घेत केला 'हा' रेकॉर्ड
गुजरातचा संघ 2016 आणि 2017 मध्ये आयपीएल स्पर्धेचा भाग होता. या संघाचे नाव गुजरात लायन्स असं होतं आणि सुरेश रैना संघाचा कर्णधार होता. 2016 मध्ये गुजरात लायन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानानंतर क्वालिफायर 2 पर्यंत पोहोचला होता. तर 2017 मध्ये हा संघ सातव्या क्रमांकावर होता.