धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे, ही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर, शुक्रवारी येत आहे. धनत्रयोदशीला प्रत्येकजण भांडी खरेदी करतात. परंतु, या दिवशी विकत घेतलेली आणि घरी आणलेली भांडी रिकामी ठेवली जात नाहीत याची कमी लोकांना माहिती आहे. घरात रिकामी भांडी आणणे अशुभ मानले जाते, म्हणून ते त्वरित भरले पाहिजेत.


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या भांड्यात कोणत्या वस्तू ठेवल्यास तुमच्या घरात आनंदाचा पाऊस पडेल.




  • घरी आणलेली भांडी पाण्याने भरा. पाणी हे नशिबाचे प्रतिक मानले जाते.

  • याशिवाय भांड्यात गूळ, साखर, तांदूळ, दूध, गूळ आणि गहू, मध देखील भरू शकता.

  • तुम्ही भांडीमध्ये नाणीही ठेऊ शकता.

  • भांडी खरेदी करण्याची योग्य वेळ कधी?


कार्तिक महिन्यातील कृष्णपक्ष (पूर्णिमंत)च्या त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्र मंथनाच्या निमित्ताने प्रकट झाले, म्हणून ही तारीख धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. भगवान धन्वंतरी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.


Sanitizer & Fire Crackers Threat | फटाके वाजवताना हाताला सॅनिटायझर लावणं जीवावर बेतू शकतं #स्पेशलरिपोर्ट