बीसीसीआयचा कारभार कोणाच्या हाती?, 24 जानेवारीला अंतिम निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 05:34 PM (IST)

नवी दिल्ली : बीसीसीआयचा कारभार कोणाच्या हाती सोपवला जाणार याचा निर्णय 24 जानेवारीला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर शुक्रावारी झालेल्या सुनावणीत नऊ प्रशासकांचा पर्याय ठेवण्यात आला. अॅमिकस क्युरी गोपाळ सुब्रमण्यम आणि ज्येष्ठ विधीज्ञ अनिल दिवाण यांनी सीलबंद लिफाफ्यात नऊ नावं सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली आहेत. ही नावं सध्या गुप्त ठेवली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारीला अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना बीसीसीआयमधील पदांवरून हटवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर बीसीसीआयमध्ये नव्या प्रशासकांची नावं सुचवण्याची जबाबादारी न्यायालयाने सुब्रमण्यम आणि दिवाण यांच्यावर सोपवली होती.