एक्स्प्लोर

बीसीसीआय मालामाल, स्टार इंडिया एका सामन्याचे 60 कोटी रुपये देणार!

2018 ते 2023 या काळात होणाऱ्या सामन्यांसाठी स्टार इंडियाने 6138.11 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत हे मीडिया हक्क मिळवले.

मुंबई : बीसीसीआयच्या भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने बाजी मारली. 2018 ते 2023 या काळात होणाऱ्या सामन्यांसाठी स्टार इंडियाने 6138.11 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत हे मीडिया हक्क मिळवले. स्टार इंडियाकडे जागतिक क्रिकेटमधील दोन मोठे मीडिया हक्क आहेत. आयसीसीचे आठ वर्षांचे आणि आता बीसीसीआयचे पुढील पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले. यापूर्वी आयपीएलसाठीही स्टार इंडियाने 16 हजार 347.5 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत बाजी मारली होती. सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि रिलायन्स या तीन समूहांमध्ये पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी चुरस होती. पण शेवटी तीन दिवस चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मीडिया हक्क आपल्या नावावर केले. या शर्यतीत दुसऱ्या दिवसअखेर आलेली अखेरची बोली 6032.50 कोटी रुपयांची होती. तर पहिल्या दिवशी अखेरची बोली 4442 कोटी रुपयांची होती. 2012 साली स्टार इंडियाने बीसीसीआयला सहा वर्षांसाठी 3851 कोटी रुपये मोजले होते. या रकमेत आता 59.18 टक्यांची वाढ झाली आहे. नव्या मीडिया हक्कांची सुरुवात 15 एप्रिलपासून सुरु होईल, तर 31 मार्च 2023 रोजी संपणार आहे. या मीडिया हक्कांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाचे मायदेशात होणाऱ्या सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयने मीडिया हक्कांसाठी तीन वेगवेगळे फॉरमॅट बनवले होते. ज्यामध्ये भारत आणि जगभरातील क्रिकेटचे टीव्ही राईट्स, भारतातील डिजीटल राईट्स आणि ग्लोबल राईट्सचा समावेश होता. स्टारकडे हॉटस्टारच्या रुपात अगोदरच डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. येत्या पाच वर्षात भारतीय संघ मायदेशात 102 सामने खेळणार आहे. यानुसार बीसीसीआयला एका सामन्याचे तब्बल 60 कोटी रुपये मिळतील. आंतरराष्ट्रीय सामन्यांची सरासरी रक्कम आयपीएल सामन्यांच्या सरासरी रकमेपेक्षा जास्त आहे. या काळात 2018 पासून 2022 पर्यंत आयपीएलच्या एका मॅचसाठी स्टार इंडिया सरासरी 54.5 कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी स्टार इंडियाने 1.9 बिलियन डॉलरमध्ये आयसीसीचे 8 वर्षांचे (2015-2023) मीडिया हक्क खरेदी केलेले आहेत. 2023 चा विश्वकपही भारतातच होणार आहे. त्यामुळे यापुढे भारतीय संघाचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget