एक्स्प्लोर
मॅन्चेस्टर हल्ल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतीचं सावट
मुंबई: मॅन्चेस्टरमधील बॉम्ब हल्ल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतीचं सावट पसरलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया उद्या इंग्लंडकडे रवाना होणार आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं तातडीची बैठक बोलावली आहे.
येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षचा प्रश्न निर्माण होऊ नये यादृष्टीने ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीसाठी टीम इंडियाचे व्यवस्थापक हजर राहणार असल्याचं समजतं आहे. या हल्ल्यानंतर येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. पॉप सिंगर गायिका अरियाना ग्रांडे यांच्या कॉन्सर्टवेळी हा हल्ला झाला.
मॅन्चेस्टर एरिना सभागृहात एक कॉन्सर्ट सुरु होतं. या कॉन्सर्टमधील गायिका अरियाना ग्रांडेचं शेवटचं गाणं सुरु असताना हे स्फोट झाले. यात 20 जणांचा मृत्यू झाला. तर स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर लोकं सैरावैरा पळायला लागले. त्यातही अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
या घटनेनंतर ग्रॅण्ड मॅन्चेस्टर पोलिसांनी लोकांना परिसरातून सुरक्षितस्थळी नेलं आहे. तसेच मॅचेन्सटरचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. तसंच अरियाना ग्रांडेलाही सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.
काय आहे मॅन्चेस्टर एरिना?
मॅन्चेस्टर एरिना हे इंग्लंडमधील सर्वात मोठं सभागृह आहे. याला ब्रिटिश एरिना असंही म्हणलं जातं. या सभागृहाची आसन क्षमता 21 हजार असून, 2002 मधील कॉमनवेल्थ खेळात या सभागृहाचा वापर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे याच सभागृहात बॉक्सिंग आणि WWE चेही सामने भरवले जातात. ते पाहण्यासाठी अनेकजण प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते.
संबंधित बातम्या:
इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी
मॅन्चेस्टर स्फोटानंतर अरियाना ग्रांडेचा मन हेलावणारा मेसेज!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement