कसोटीत बांगलादेशच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
कॅमेरुन रोचच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. बांगलादेशचा पहिल्या डावा 18.4 षटकांमध्ये केवळ 43 धावांमध्ये आटोपला.

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 43 धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमधील मागील 116 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
कॅमेरुन रोचच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. बांग्लादेशचा पहिल्या डावा 18.4 षटकांमध्ये केवळ 43 धावांमध्ये आटोपला.
बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 25 धावा केल्या. बांगलादेशच्या इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. कसोटी क्रिकेटमधील बांगलादेशची एका डावातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
वेस्ट इंडिजकडून कॅमेरुन रोचने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. मिग्युएल कमिन्सने तीन तर जेसन होल्डरने दोन बांगलादेशी फलंदाजांना बाद केले.
बांगलादेशला अवघ्या 43 धावांत रोखल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. दिवसअखेर वेस्ट इंडिजने दोन विकेट्स गमावून 201 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ड्वेन स्मिथने 58 तर कॅरॉन पोवालने 48धावांची खेळी केली. क्रेग ब्रॅथवेट 88 धावांवर खेळत आहे.























