एक्स्प्लोर

Asian Games 2018 : तेराव्या दिवशी भारताच्या खात्यात 2 रौप्य, 4 कांस्य पदकं

स्क्वॉशमध्ये महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर बॉक्सर अमित पंघालनं एशियाडच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे दोन रोप्य पदकंही निश्चित झाली आहेत.

जकार्ता : इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियाडच्या तेराव्या दिवशी भारताच्या खात्यात दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर पडली आहे. हॉकीत भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिला हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतानं जपानकडून 1-2 अशी हार स्वीकारली.

सेलिंग प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं भारतानं सेलिंग प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. महिलांच्या फोर्टी नाईन ईआर एफएक्स शर्यतीत भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगार यांनी रौप्यपदकाची कमाई केली. त्या दोघींनी पंधरा शर्यतींअखेर दुसऱ्या क्रमांकाच्या 40 गुणांची नोंद केली.

महिलांच्या ओपन लेसर 4.7 प्रकारात भारताची हर्षिता तोमर कांस्यपदकाची मानकरी ठरली. हर्षितानं बारा शर्यतींअखेर 62 गुणांची वसुली करून तिसऱ्या स्थानावर आली. पुरुषांच्या फोर्टी नाईन ईआर प्रकारात वरुण अशोक ठक्कर आणि सी. के. गणपती यांनी भारताच्या खात्यात कांस्यपदकाची भर घातली. त्या दोघांनी पंधरा शर्यतींअखेर तिसऱ्या क्रमांकाच्या 53 गुणांची कमाई केली.

पुरुषांना स्क्वॉश प्रकारात कांस्य पुरुषांच्या स्क्वॉश प्रकारात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारतानं हाँगकाँगकडून 0-2 अशी हार स्वीकारली. या लढतीत भारताला हाँगकाँगच्या तोडीची कामगिरी बजावता आली नाही. भारतीय पुरुषांच्या कांस्यविजेत्या चमूत सौरव घोषाल, हरिंदरपालसिंग संधू, रमित टंडन आणि महेश माणगावकरचा समावेश आहे.

बॉक्सर विकास कृष्णन कांस्य पदक बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे एशियाडच्या कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. विकास कृष्णनच्या डाव्या पापणीच्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीयदृष्ट्या अनफिट घोषित करण्यात आलं. परिणामी विकास कृष्णन 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत खेळू शकला नाही. या कामगिरीनं विकास कृष्णनच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद झाली. सलग तीन एशियाडमध्ये पदकांची कमाई करणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. त्यानं 2010 सालच्या एशियाडमध्ये लाईटवेट गटाच्या सुवर्णपदकाची, तर 2014 सालच्या एशियाडमध्ये मिडलवेट गटाच्या कांस्यपदकाची कमाई केली होती.

स्क्वॉशमध्ये महिलांची अंतिम फेरीत धडक भारतीय महिलांनी गतविजेत्या मलेशियाचा २-० असा पराभव करून, एशियाडमधल्या स्क्वॉशच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत भारतीय महिलांचा सामना हाँगकाँगशी होईल. या कामगिरीनं महिलांच्या स्क्वॉश प्रकारात भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे. भारताच्या या चारसदस्यीय चमूत जोश्ना चिनाप्पा, दीपिका पल्लिकल, सुनयना कुरुविला आणि तन्वी खन्ना यांचा समावेश आहे.

बॉक्सर अमित पंघाल अंतिम फेरीत भारताचा बॉक्सर अमित पंघालनं एशियाडच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे अमितकडून भारताला किमान रौप्यपदकाची अपेक्षा करता येईल. इंडोनेशियातल्या एशियाडची फायनल गाठणारा तो भारताचा एकमेव बॉक्सर ठरला. मूळचा हरयाणाचा अमित पंघाल हा सेनादलाच्या सेवेत आहे. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं रौप्यपदकाची कमाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget