Asian Champions Trophy 2021: आशिया खंडातील देशांसाठी हॉकी विश्वातील एक मानाची स्पर्धा असणारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत भारतीय हॉकी संघानं (Indian Hockey Team) सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. पण सेमीफायनलच्या सामन्यात भारताला जपानने 5-3 ने पराभूत केल्याने भारत स्पर्धेबाहेर गेला आहे. तर जपान फायनलमध्ये एन्ट्री मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND Vs PAK) 3-1 ने पराभव करुन भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. पण सेमीफायनलमध्ये मात्र जपानने भारताला मात दिली आहे. सामन्यातील गोल्स पाहता जरी सामना अत्यंत चुरशीचा वाटत असला तरी सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारत सामन्यात काहीसा मागच्या पावलांवर होता. सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये जपानने दोन गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण जपानने दमदार डिफेन्सचं प्रदर्शन दाखवलं. पण अखेर दिलप्रीत सिंगने पहिला गोल करत स्कोरबोर्ड 2-1 असा केला. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये जपानने रॅफरलच्या मदतीने पेनल्टी स्ट्रोक घेत गोल केला आणि स्कोरबोर्ड 3-1 झाला. त्यानंतर चौथ्या क्वॉर्टरमध्ये जपानने सलग दोन गोल करत 5-1 अशी गोलसंख्या केली. ज्यानंतर शेवटच्या काही मिनिटांत भारताने कमबॅक कऱण्याचा प्रयत्न केला. भारताने 2 गोलही केले. पण जपानची गोलसंख्या अधिक असल्याने भारत पराभूत झाला.
जपानची फायनलमध्ये एन्ट्री
या विजयासह भारताचं फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. दरम्यान जपानचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. आता जपान फायनलमध्ये दक्षिण कोरियाशी भिडणार आहे. या दोघांमधील विजेताच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरेल.
हे ही वाचा
- IND vs SA Test Series : कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमध्ये करु शकतो खास रेकॉर्ड, कोच राहुल द्रविडला मागे टाकण्यासाठी सज्ज
- PV Sindhu lost to Tai Tzu: पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- India Tour Of South Africa: कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, पाहा फोटो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha