PAK vs SL, Asia Cup 2022 Final: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात (Sri Lanka vs Pakistan) आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) मागं टाकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली सध्य टॉपवर आहे. तर, मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवाननं आज श्रीलंकेविरुद्ध 51 धावा केल्या तर तो कोहलीला मागं टाकून यंदाच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल.

आशिया चषक 2022 स्पर्धेत विराट कोहलीनं 92 च्या सरासरीनं सर्वाधिक 276 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.दुसरीकडं मोहम्मद रिझवाननं 5 सामन्यांमध्ये 56.50 च्या सरासरीनं 226 धावा केल्या आहेत. कोहलीला मागं टाकण्यासाठी मोहम्मद रिझवान फक्त 51 धावा दूर आहे. 

आशिया चषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-

क्रमांक फलंदाज धावा
1 विराट कोहली 276
2 मोहम्मद रिझवान 226*
3 इब्राहिम जादरान 196
4 पथुम निसांका - 165 165
5 कुसल मेंडिस 155

आशिया चषक जिंकणारे संघ
श्रीलंकेच्या संघानं आतापर्यंत पाच वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे आणि तो या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. तर, पाकिस्ताननं आतापर्यंत दोनदा आशिया चषक जिंकला असून आता तिसर्‍यांदा विजेतेपद पटकावण्याच्या त्यांचा प्रयत्न असेल. भारतानं सर्वाधिक वेळा ही आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. भारतानं आतापर्यंत सात वेळा आशिया चषकावर नाव कोरलं आहे.

हे देखील वाचा-