PAK vs SL Asia Cup 2022 Final : आज आशिया कप स्पर्धेचा (Asia Cup 2022) अंतिम सामना रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेत लढतीसाठी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना आज दुबई इंटननॅशनल स्टेडियममध्ये रंगणार असून याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान या सामन्या संदर्भात पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यांनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'आशिया कप स्पर्धेत टॉस जिंकणारा संघचं सामना जिंकताना पाहायला मिळाला आहे, त्यामुळे या सामन्यातही नाणेफेक जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य बाबर आझम यांनं केलं आहे. 


'अंतिम फेरीत पोहोचणं ही मोठी गोष्ट'


पाकिस्तानचा कणर्धार बाबर आझम यांनं म्हटलं आहे की, आशिया कप स्पर्धेत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. या स्पर्धेत आम्हाला अनेक चढ-उतार पाहावे लागले. मात्र आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो, ही फारर मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. पाकिस्तानचा सध्याचा संघ चांगली खेळी करत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे.


कोण जिंकणार आशिया कप 2022?


आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत आज अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान  (Sri Lanka vs Pakistan) या दोघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघानी सुपर 4 मध्ये सर्वाधिक सामने जिंकत फायनलमध्ये धडक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाची स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली होती, श्रीलंकेला अफगाणिस्तानने तर पाकिस्तानला भारताने सलामीच्या सामन्यात मात दिली होती. त्यानंतर मात्र दोघांनी उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करत थेट फायनलपर्यंत धडक घेतली आहे. आता या दोघांपैकी एकजण स्पर्धेचा खिताब जिंकणार असून नेमका हा सामना कधी, कुठे पाहता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज अर्थात 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.  


अशी असू शकते संभाव्य अंतिम 11


श्रीलंका संघ :


दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दिनेश चांदीमल.


पाकिस्तानचा संघ :


बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह.