Solapur News: सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
असं आहे इंदिरा गांधी स्टेडियम
सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम
सोलापूरची ओळख असलेल्या या स्टेडियमची प्रशासकीय अनास्थेमुळे दुरावस्था झाली होती
त्यामुळे क्रिकेट ऐवजी या ठिकाणी केवळ राजकीय सभाच होऊ लागल्या होत्या
मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे रुपडे पालटण्यात आले आहे
काय आहेत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची वैशिष्ट्ये?
22 हजार स्क्वेअर मीटर इतके मैदानाचे क्षेत्रफळ
मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे मैदान
मैदानात 11 मुख्य धावपट्या तर सरावासाठी 8 अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण 19 धावपट्ट्या तयार
25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता
अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ज्यामुळे पावसानंतर अवघ्या तीस मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 च्या मॅचेस होऊ शकतील अशी संपूर्ण व्यवस्था
क्रिकेट मैदान सोबत या ठिकाणी टेबल टेनिस, हॉलीबॉल, स्विमिंग टॅंक, लॉन टेनिस इत्यादी खेळाची मैदाने विकसित करण्यात आली आहेत
मैदान शेजारीच अद्यावत जिमनॅशिअमची सुविधा
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नूतनीकरण झालेल्या या मैदानावरील धावपट्टीची चाचणी करण्यासाठी 19 वर्षांखालील मुलींची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी राज्यभरातून नऊ संघ सहभागी झालेत. मॅच खेळलेल्या खेळाडूंच्या पसंतीस देखील हे मैदान उतरत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून या मैदानावरील धावपट्टीचे निरीक्षण करण्यात आले आहे. तेव्हा तपासणी समितीच्या तपासणीत इथल्या धावपट्टी एकदम ओके ठरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इथे रणजी, टूलीप असे सामने होऊ शकतात अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे.
इतर महत्वाच्या बातम्या