T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मते, विश्वचषकासाठी भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे. पण रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, आतापर्यंत निवडकर्त्यांनी अंतिम संघाची यादी जाहीर केली नाहीये. आशिया चषक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीच्या नजरा असतील. निवडकर्ते 15 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी संघ निवडतील. सध्या भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. तसेच आशिया चषकात विराट चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, एका निवडकर्त्यानं सांगितलं की, “रोहित शर्मा संघ व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. पण निवडकर्ते वेगळा विचार करत आहेत. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी निवड समितीची बैठक होणार आहे. अनेक ठिकाणी खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. विराट कोहलीची जागाही निश्चित नाही", असंही त्यानं म्हटलंय. निवडकर्त्यानं पुढं म्हटलंय की, आणखी बऱ्याच खेळाडूंच्या कामगिरीवर आम्ही लक्ष ठेवून आहेत. तसेच हर्षल पटेल, जसप्रीत बुमराहच्या फिटनेसच्या अहवालांरकडं आमचं लक्ष असेल. दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त असून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. आम्ही त्यांची दुखापतीतून सावरण्याची वाट पाहत आहोत. विराट कोहली आशिया चषकात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं आहे."
चार गोलंदाजांचं स्थान जवळपास निश्चित
निवडकर्ते 15 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहेत. या दिवशी निवडकर्त्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा देखील सहभागी होणार आहेत. आशिया चषक 11 सप्टेंबर रोजी संपत असून त्यानंतर हे खेळाडू भारतात परततील. आशिया चषकासाठी भारतीय संघात फक्त तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या पाहता संघात चार वेगवान गोलंदाज मिळणं निश्चित आहे. युझवेंद्र चहलशिवाय संघातील दुसरा फिरकीपटू कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं.
हे देखील वाचा-