All the squads for 2022 Asia Cup : आशिया कपसाठी (Asia Cup 2022) आधी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असताना आता हाँगकाँगने देखील या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे एकूण 6 संघ आशिया कपसाठी आमने-सामने असतील. बुधवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगने आशिया कपचे यजमान यूएई संघाला 8 विकेट्सनी मात दिली. या विजयासोबत हाँगकाँगने आशिया कपमध्ये जागा पक्की केली आहे. दरम्यान आता सर्व संघ निश्चित झाले असल्याने कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत ते पाहूया...


भारत 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.


पाकिस्तान 
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.


हाँगकाँग 
निजाकत खान (कर्णधार), किनचित शाह, जीशान अली, हारून अरशद, बाबर हयात, आफताब हुसेन, अतीक इकबाल, एजाज खान, एहसान खान, स्कॉट मॅककेनी (विकेटकीपर), गजनफर मोहम्मद, यासिम मुर्तजा, धनंजय राव, वाजिद शाह, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, मोहम्मद वहीद


अफगानिस्तान
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, अफसर जजई, अजमतुल्लाह ओमरजई, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी 


बांग्लादेश
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, महमूदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, एबादोट हुसैन, परवेज हुसैन एमोन, मोहम्मद नईम.


श्रीलंका
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.


कसं आहे वेळापत्रक?


आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये  श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...


ग्रुप स्टेजचे सामने


27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग


ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. 



हे देखील वाचा-