Asia Cup 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. परंतु, तो एक स्टार क्रिकेटपटू आहे, यात काही शंका नाही. जगभरात विराट कोहलीची मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. याच दरम्यान, विराट कोहलीच्या एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल (Social Media) मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी तो लाहोरहून (Lahor) थेट यूएईला (UAE) पोहचला. 


आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान येत्या 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत.  यासाठी यूएईत दाखल झालेल्या भारतीय संघ सराव करून हॉटेलच्या दिशेनं जात असताना एका चाहत्यानं विराटसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. त्यावेळी या चाहत्यानं विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी पाकिस्तानहून आलो आहे, असं ओरडायला सुरुवात केलीय. हे ऐकताच विराट कोहलीनं त्याला सेल्फी घेण्यासाठी बोलावून घेतलं. विराट सोबतचा हा क्षण तो कधीच विसरणार नाही, असंही तो म्हणालाय. 


व्हिडिओ-



विराटसाठी पाकिस्तानहून यूएईला पोहचला
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद जिब्रान असं त्या चाहत्याचं नाव आहे. तो पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून विराट कोहलीची खूप मोठा चाहता आहे. विराट कोहलीसोबत घेण्यासाठी त्यानं दीर्घकाळ प्रतिक्षा केलीय. मोहम्मद जिब्रान म्हणतो की, "भारताचा माजी कर्णधार विराट कोहली एक अद्भुत व्यक्ती आहे. माझे म्हणणं ऐकून त्यानं सेल्फी घेण्यास होकार दिला. विराट कोहली लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतावा, अशी प्रार्थना करतो." मोहम्मद जिब्रान पुढं म्हणाले की, "मी आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूसोबत सेल्फी घेतलेला नाही. मात्र, विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्याची इच्छा खूप जुनी होती"


विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-