एक्स्प्लोर

Shaheen Afridi Replacement : ना मोहम्मद आमिर, ना वहाब रियाझ 'या' युवा खेळाडूला आशिया कपमध्ये शाहीनच्या जागी संधी

Shaheed Afridi : पाकिस्तान संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे यंदाच्या आशिया कपला हुकणार असून त्याच्याजागी एका 22 वर्षीय खेळाडूला संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Asia Cup 2022 : आगामी आशिया चषक 2022 स्पर्धेसाठी पाकिस्तानचा हुकूमी एक्का शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) खेळणार नाही ही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तो दुखापतीमुळे आशिया चषक 2022 स्पर्धा खेळणार नाही, अशामध्ये त्याला रिप्लेसमेंट म्हणून कोणत्या खेळाडूला संधी मिळणार या चर्चेला बरच उधाण आलं होतं. मोहम्मद आमिर (Mohammad aamir) वहाब रियाझ (Wahab Riaz) अशी अनुभवी नावं समोर असताना संधी मात्र युवा खेळाडू मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याला मिळाली आहे.

22 वर्षीय मोहम्मदने 26 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 8 एकदिवसीय सामन्यांत 6.41 च्या इकॉनमी रेटने 12 तर 18 टी20 सामन्यांमध्ये 7.91 च्या इकॉनमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 8 वन-डे सामन्यांत 43 धावा तर 18 टी20 मॅचमध्ये 5 धावा केल्या आहेत. अत्यंत कमी अनुभवी असूनही मोहम्मदची गोलंदाजी भेदक असल्यामुळे त्याला या भव्य स्पर्धेसाठी संघात संधी मिळाली आहे. पण मोहम्मद याची बोलिंग अॅक्शन योग्य नसल्यामुळे काही महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. पण त्याने केलेल्या बदलामुळे आता त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं आहे.

आमिर-रियाझच्या नावाची होती चर्चा

शाहीन आफ्रिदीला श्रीलंका दौऱ्यात दुखापत झाली होती, मात्र तो आशिया कपसाठी तंदुरुस्त होईल, असे मानले जात होते. दरम्यान तो अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने शाहीन आफ्रिदीच्या जागी आशिया कपमध्ये कोणाला संधी मिळेल याबाबत अनेक चर्चा होत होती.  मोहम्मद आमिरला (Mohammad aamir) संधी मिळू शकते, असे मानले जात होते तसेच संघाचा अनुभवी गोलंदाज वहाब रियाझ (Wahab Riaz) यालाही संधी मिळेल अशी चर्चा होती. पण अखेर मोहम्मद हसनैनला संधी मिळाली आहे. 

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

कधी, कुठं रंगणार भारत-पाकिस्तान सामना?

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Opposition Party Vs Mahayuti : विरोधकांचा सरकारवर आरोप, चहापानावर बहिष्कारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
Embed widget