Women's Asia Cup Final Viral Video : भारतीय महिला संघाने सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंका संघाचा आठ विकेट्सनं पराभव केला. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला फक्त 66 धावाच करता आल्या. प्रत्युत्तर दाखल भारतानं हे आव्हान दोन गडी आणि 8.3 षटकांमध्ये सहज पार केलं. रेणुका सिंह (Renuka Singh), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या भेदक माऱ्यानंतर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं आशिया चषक उंचावला.


सातव्यांदा आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघाच्या आनंद गगणात मावत नव्हता. भारतीय महिला संघानं विजयी जल्लोष केला. चषकासह टीम इंडिया एन्जॉय करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशिया चषक जिंकणाऱ्या टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटूसह नेटकऱ्यांनाही महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.   


 






 










सामन्यात काय झालं?
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे 4 फलंदाज तंबूत पोहोचले होते. श्रीलंकेकडून केवळ ओशादी रणसिंघेने 13 आणि इनोका रणवीराने नाबाद 18 धावा केल्यामुले त्यांनी 65 धावांपर्यंत मजल मारली. ज्यामुळे भारताला विजयासाठी आता 66 धावांची गरज होती. स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हे आव्हान सहज पार केलं.