IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) दारुण पराभव केला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर ऑलआऊट केलं. प्रत्युत्तरात भारतानं पाच विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला कडवी झुंज दिली. परंतु, अखेरच्या षटकात 7 धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी कर्णधार सरफराज अहमदनं (Sarfaraz Ahmed) महिला पत्रकाराबद्दल (female journalist) एक ट्विट केलं, ज्यानंतर वादाला सुरुवात झाली.


सरफराजनं त्याच्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की,"17व्या षटकात स्लो ओव्हर रेटमुळं पाच खेळाडू सर्कलच्या आत होते आणि एक कथित महिला पत्रकार राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर पाकिस्तानचे खेळाडू धावाही करत नाही, झेलही पकडत नाही असं म्हणत चिखलफेक करतेय. कमाल आहे." सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यानं त्यांच्याकडून दंड आकरण्यात आला. तसेच  शेवटच्या तीन षटकांत दोन्ही संघातील खेळाडूंना 30 यार्डच्या सर्कलमध्ये चार ऐवजी पाच खेळाडू ठेवावी लागली.


ट्वीट- 


सुपर 4 फेरीत भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता
गट-अ आणि गट-ब मधील अव्वल दोन संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. हे सामने 3 सप्टेंबरपासून सुरू होतील. 3 सप्टेंबरला ब गटातील टॉप-2 संघ आमनेसामने येतील. यानंतर, 4 सप्टेंबर म्हणजेच रविवारी गट-अ मधील टॉप-2 संघ ऐकमेकांशी भिडतील. समीकरणे बरोबर राहिल्यास 4 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक रंजक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. 


अंतिम सामना सामना कधी?
आशिया चषक 2022 च्या सहा संघांमध्ये भारत आणि पाकिस्तानची नावे बलाढ्य संघांमध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच सुपर-4 सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचू शकतात. असं झालं तर 11 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीतही भारत-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना रंगण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा- 


Asia Cup 2022: बांग्लादेश- अफगाणिस्तान आज एकमेकांशी भिडणार; कधी, कुठं रंगणार सामना?


AUS vs ZIM: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघाच्या स्टार ऑलराऊंडरला दुखापत