Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) 5 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीच 3 विके्टस घेत महत्त्वपूर्ण अशा 33 धावाही केल्या. दरम्यान त्याच्या या खेळीचे सर्वचजण फॅन झाले असून अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानने (Rashid Khan) हार्दिक पांड्याच्या खेळीचं कौतुक करत आय़पीएलमध्ये गुजरात संघाचं नेतृत्त्व केल्यामुळे त्याच्या खेळीत हा फरक पडला असून त्याचा माइंडसेटही बदलला असं राशिद म्हणाला.
राशिद खानने हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजासारखे खेळाडू संघासाठी आवश्यक असल्याचंही यावेळी नमूद केलं. तो म्हणाला, "कोणत्याही संघाला हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंची गरज असते. असे खेळाडू संघाला चांगले योग्यवेळी सावरतात आणि त्यामुळे कर्णधाराचा भार कमी होतो. तसंच हार्दिकबद्दल बोलताना राशिद म्हणाला “हार्दिक पांड्याला जबाबदारी घ्यायला आवडतं. गुजरातचा कर्णधार झाल्यापासून त्याची मानसिकता बदलली आहे. हार्दिकला त्याची क्षमता माहीत आहे आणि तो संघाचा डाव पुढे नेऊ शकतो. मानसिकदृष्ट्या हार्दिक सामन्यातील प्रत्येक परिस्थितीत खूप मजबूत राहत असल्याचं दिसून येतं.
पांड्याचा कॉन्फिडन्सने जिंकली सर्वांची मनं
अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूत फक्त एक धाव निघाली. षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. हार्दीक यावेळी जे काही टार्गेट आहे, ते नक्कीच करेन असं अगदी विश्वासाने न काही बोलता आपल्या रिएक्शनमधून दाखवून देत असल्यानं त्याच्या या खेळीचं आणखीच कौतुक होत आहे.
राशिद-हार्दिक गुजरात संघात
राशिद खान आणि हार्दिक पांड्या हे दोघेही आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्स या स्पर्धेतील नव्या संघासोबत करारबद्ध झाले होते. हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने पहिल्या सत्रातच गुजरातला विजेतेपद मिळवून दिले. राशिद खाननेही स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता आशिया कप 2022 मध्ये देखील सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान आमने-सामने येऊ शकतात.
हे देखील वाचा-