IND vs PAK Super 4, Asia Cup 2022: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. यंदाची स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळली जात असल्यानं मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज सुपर-4 मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे. आशिया चषकातील गट सामन्यात भारतानं पाकिस्तानला पाच विकेट्नं धुळ चारली होती. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतील. यामुळं दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज खेळला जाणारा सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आशिया चषकाच्या गट सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर गुंडाळलं. भारतानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता
पाकिस्तानविरुद्ध आजच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो या सामन्यात खेळू शकतो. तसेच आवेश खानला व्हायरल ताप असून त्याच्या खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या जागी अनुभवी फिरकीपटू अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती.
हार्दिक पांड्या आज खेळणार का?
पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला हाँगकाँगविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली होती. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यात भारतीय संघात पुनरागमन करेल. यामुळं कोण बाहेर पडणार? हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आशिया चषकात केएल राहुलला अद्याप काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याला संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव किंवा ऋषभ पंत डावाची सुरुवात करू शकतात.
शाहनवाझ दहनीच्या जागेवर कोणाला मिळणार संधी?
पाकिस्तानकडून खेळताना विरुद्ध संघाचं कंबरड मोडणाऱ्या शाहनवाझ दहनीच्या रुपात पाकिस्तानलाही फटका बसलाय. दुखापतीमुळं भारताविरुद्ध सामन्यात त्याला खेळता येणार नाही. यामुळं पाकिस्तानचा संघ दहनीची जागा भरून काढणाऱ्या कोणत्या खेळाडूला संधी देतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याच्या जागी पाकिस्तानकडं हसन अली आणि तरून मोहम्मद यांच्यात रुपात दोन पर्याय आहेत. हसन अली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. पण अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानचा संघ हसन अलीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-