Mushfiqur Rahim Retirement : बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रहीमनं बांग्लादेशसाठी 102 सामने खेळले आहेत. मुशफिकुर रहीमनं संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी केली होती. मात्र आशिया कपमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. बांग्लादेशला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं सुपर फोरमध्ये संघ पोहोचू शकला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला केवळ एक धाव करता आली होती तर श्रीलंकेविरुद्ध त्यानं केवळ चार धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये बांग्लादेशचा पराभव झाल्यानं आशिया कपमधून त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला.
अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम म्हणजे संघातील आक्रमक खेळाडू. त्याने आतापर्यंत 102 टी20 सामने खेळले 1500 धावा त्याने केल्या असून 72 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.
2018 सालच्या आशिया चषकात रहिमचा विक्रम
मुशफिकुर रहिमने 2018 सालच्या आशिया चषकात एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या सामन्यात त्यानं शानदार शतक ठोकलं होतं. शतकवीर रहीमने या विक्रमामुळे धोनी आणि संगकारासारख्या दिग्गजांना मागे टाकलं होतं. रहीमने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 150 चेंडूत 144 धावा ठोकल्या होत्या. आशिया चषकाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली होती. तर आशिया चषकात एखाद्या विकेटकीपरने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या होती. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे सोडत मुशफिकुरने या विक्रमाला गवसणी घातली होती. त्याआधी आशिया चषकात विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावसंख्या कुमार संगकाराच्या नावे होती. संगकाराने बांगलादेशविरोधात 2008मध्ये 121 धावा केल्या होत्या.
याशिवाय मुशफिकुरनं वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये देखील आपल्या कामगिरीची वेगळी छाप पाडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या