IND vs PAK Asia Cup: आशिया चषक टी-20  (Asia Cup T20)स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. आशिया चषकातील सुपर फोर लीगच्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून टी-20  विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. आता आशिया चषक टी-20 स्पर्धेत अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला आजची कठीण परीक्षाही पास करावी लागणार आहे.


साखळी सामन्यातील विजयात मोलाची कामगिरी बजावणार रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायची की रिषभ पंतच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज खेळवायचा याचा फैसला संघ व्यवस्थापनाला करायचा आहे. शिवाय रोहित, राहुल यांनाही कामगिरीत सुधारणा करावी लागेल. दुसरीकडे हाँगकाँगचा 38 धावात खुर्दा पाडणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे आज होणार सामना नेहमीप्रमाणे काँटे की टक्कर ठरणार यांत शंका नाही.


अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन


टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आर अश्विन.


पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रउफ, हसन अली.


जाडेजाला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला मुकावं लागण्याची शक्यता


टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला मुकावं लागण्याची शक्यता आहे. जाडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून, या दुखापतीमुळं त्याला युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे. जाडेजाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचं समजतं. या शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान सहा महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात येऊ शकतो. दरम्यान, जाडेजाच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषक असो किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतीय संघात रवींद्र जाडेजाचा समावेश असणं का महत्त्वाचं आहे. 


विराट कोहली पुन्हा फॉर्मात 


ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकाच्या निमित्तानं विराट कोहली पुन्हा फॉर्मात येत असल्याचं चित्र आहे. त्यानं गटनिहाय साखळीत पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूंत 35 आणि हाँगकाँगविरुद्ध 44 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीच्या या कामगिरीनं भारतीय चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  



हे देखील वाचा-