IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकात भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नशीम शाहनं (Naseem Shah) दमदार प्रदर्शन केलं. भारताविरुद्ध गोलंदाजी करताना नशीम शाहच्या पायाला क्रॅम्प आला. परंतु, तरीही त्यानं आपलं षटक पूर्ण केलं. पाकिस्तानच्या विजयासाठी झुंज देणाऱ्या नसीम शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारताविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर नसीम शाह रडत-रडत ड्रेसिंग रुममध्ये परताना दिसत आहे.
आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर ऑलआऊट केलं. प्रत्युत्तरात भारतानं पाच विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला कडवी झुंज दिली. परंतु, अखेरच्या षटकात 7 धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं.
व्हिडिओ-
नशीम शाहचा रडत ड्रेसिंगरूममध्ये परतला
भारताविरुद्ध पराभवानंतर नसीम शाह रडत मैदानाबाहेर जात असल्याचं दिसून आलं. ही व्हिडिओ क्लिप डीबीटीव्ही स्पोर्ट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, नसीम जेव्हा मैदानातून परतत होता, तेव्हा तो हाताने तोंड झाकताना दिसत होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर नशीम शाहला अश्रु अनावर झाल्याचं समजत आहे.
नसीम शाहचं दमदार पदार्पण
भारताविरुद्ध पदापर्णाच्या सामन्यात नसीम शाहनं 4 षटकात 27 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. नसीम शाहनं पहिल्याच षटकात केएल राहुलला शून्यावर आऊट केलं. यानंतर त्यानं सूर्यकुमार यादवलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. नसीम शाह जेव्हा गोलंदाजी करत होता, त्यावेळी त्याच्या पायला क्रॅम्प आला. परंतु, त्यानंतरही त्यानं आपलं षटक पूर्ण केलं. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 96वा खेळाडू आहे. 19 वर्षीय नसीमनं अलीकडंच नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.
हे देखील वाचा-