एक्स्प्लोर

Asia Cup 2022 : बांगलादेश-श्रीलंका यांच्यात 'करो या मरो' मुकाबला, पराभूत संघाचं होणार 'पॅकअप'

Asia Cup 2022,  BAN vs SL : अफगाणिस्तान आणि भारतीय संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीमध्ये धडक मारली आहे.

Asia Cup 2022,  BAN vs SL : अफगाणिस्तान आणि भारतीय संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता उर्वरित चार संघामध्ये सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी चुरस वाढली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामना करो या मरो असा झालाय. आज आशिया चषकात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये करो या मरो असा सामना होणार आहे. विजेता संघ सुपर 4 फेरीत प्रवेश मिळवणार आहे तर पराभूत संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. 

 आशिया कप 2022 मध्ये ग्रुप ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघाने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत सुपर 4 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. अफगाणिस्ताननं श्रीलंकाविरोधात एकतर्फी विजय मिळवला होता तर बांगलादेशविरोधात त्यांना टक्कर मिळाली होती. आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 साठी पात्र ठरणार आहे तर पराभूत संघाचं पॅकअप होणार आहे.  

बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघ कमकुवत आहेत. गेल्या काही दिवसांतील दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली आहे. बांगलादेश संघाला मागील 16 टी 20 सामन्यापैकी 14 मध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर श्रीलंका संघाला मागील 14 टी 20 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ टी 20 मध्ये आतापर्यंत 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये श्रीलंका 8 तर बांगलादेश चार वेळा जिंकलाय. पण मागील तीन सामन्याचा विचार करता बांगलादेशनं दोन सामन्यात बाजी मारली आहे तर श्रीलंका संघाला फक्त एक विजय मिळवता आलाय. 

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या खेळपट्टीवर आताच सामना झालाय आहे, त्यामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करु शकतो. 

बांगलादेशचा संघ - 
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, महमूदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, एबादोट हुसैन, परवेज हुसैन एमोन, मोहम्मद नईम.

श्रीलंकेचा संघ -
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget