एक्स्प्लोर

19 तारखेला पाकिस्तानसोबत टक्कर, आजपासून आशिया चषकाची सुरुवात

वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आज 15 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

अबूधाबी :  रोहित शर्माची टीम इंडिया आशिया चषकात खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आज 15 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान,  श्रीलंका,  बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना मंगळवार, 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवार 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आशिया चषक जिंकणार का, याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. वाचा -  आशिया चषकात टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर  महामुकाबला रोहित शर्माची टीम इंडिया आणि सर्फराज अहमदची पाकिस्तान आर्मी याच महामुकाबल्याचं आकर्षण घेऊन, सुरुवात होत आहे आशिया चषकाच्या महासंग्रामाला. दुबई आणि अबूधाबी या दोन शहरांमध्ये आशिया चषकाच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ आशिया चषकाच्या रणांगणात आमनेसामने येणार आहेत. अ आणि ब गटात विभागणी आशिया चषकातल्या सहा संघांची अ आणि ब अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग या तीन संघांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीन संघ ब गटात असतील. गटवार साखळी सामन्यांनंतर प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ हे सुपर फोर लढतींसाठी पात्र ठरतील सुपर फोरच्या अव्वल साखळीतून सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारताचं वर्चस्व आजवरच्या इतिहासात आशिया चषकावर भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. आजवरच्या तेरापैकी सहा आशिया चषकांत भारतानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. 2016 सालच्या आशिया चषकात भारतानं बांगलादेशवर आठ विकेट्सनी मात करत विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळं टीम इंडियाच्या शिलेदारांसमोर गतविजेतेपदाचा लौकिक कायम राखण्याचं आव्हान असेल. भारत-पाकिस्तान तुल्यबळ लढत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक संघांमधली तुल्यबळ लढत हे यंदाच्या आशिया चषकाचं मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचं उट्टं काढण्याची संधी टीम इंडियाला आशिया चषकात मिळणार आहे. आशिया चषकाच्या गटवार साखळीत आणि अव्वल साखळीत मिळून किमान दोनवेळा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना भिडणार आहेत. आणि योगायोगानं त्याच दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली, तर आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना तिसऱ्यांदा पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला दिलेली विश्रांती आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे. आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचे शिलेदार आशिया चषकात कशी कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद Asia Cup 2018 Date and Time आशिया चषक वेळापत्रक साखळी फेरी- 15 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – दुबई 16 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध  हाँगकाँग – दुबई 17 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी 18 सप्टेंबर – भारत विरुद्ध हाँगकाँग – दुबई 1 9 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई 20 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी सुपर फोर 21 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – दुबई 21 सप्टेंबर – गट ब विजेता विरुद्ध  अ गट उपविजेता – अबु धाबी 23 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – दुबई 23 सप्टेंबर – ब गट विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी 25 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता – दुबई 26 सप्टेंबर – अ गट उपविजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी अंतिम सामना- 28 सप्टेंबर – आशिया चषक 2018 अंतिम सामना – दुबई संबंधित बातम्या 
आशिया चषकात टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर 
 एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 
 आशिया चषकापूर्वी भारतासाठी खुशखबर, भुवी पुनरागमनासाठी सज्ज  
 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget