एक्स्प्लोर

INDvsPAK : भारताचा पाकिस्तानवर आठ विकेट्स राखून एकतर्फी विजय

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अख्खा डाव सर्व बाद 162 असा गुंडाळला होता. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला.

दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान राखलं. दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 163 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत ते लक्ष्य गाठून पाकिस्तानची खाशी जिरवली. रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा पाया रचला. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित शर्माने 39 चेंडूंमध्ये 52, तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली. भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं. डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला. आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. मात्र एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंची हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंची हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Embed widget