एक्स्प्लोर

भारताचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय, सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं

बांगलादेशनं टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.

दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशवर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपलं नाव कोरलं. बांगलादेशनं अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.

भुवनेश्वर कुमार बाद झाला, त्या वेळी भारताला अकरा चेंडूंत विजयासाठी नऊ धावा हव्या होत्या. आणि हाताशी केवळ तीन विकेट्स होत्या. केदार जाधवच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळं तो मोठे फटके खेळू शकत नव्हता. त्या कठीण परिस्थितीत जाधव आणि कुलदीप यादवनं नेटानं खेळून विजयाचं समीकरण एका चेंडूत एका धावेवर आणलं. मग महमदुल्लाहच्या अखेरच्या चेंडूवर जाधव आणि यादवनं लेग बाय घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा बनवल्या. महेंद्रसिंह धोनी (36) आणि दिनेश कार्तिकनं (37) विजयामध्ये आपलं योगदान दिलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसननं 21 षटकांत दिलेली 120 धावांची सलामी टीम इंडियाच्या चाहत्यांना धडकी भरवणारी होती.

पण त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. केदार जाधवनं मेहदी हसनला बाद करून सलामीची जोडी फोडली. आणि मग बांगलादेशचा अख्खा डाव 222 धावांत गडगडला. भारताकडून कुलदीप यादवनं तीन, केदार जाधवनं दोन तर यजुवेंद्र चहलनं आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताच्या फिरकी त्रिकूटानं बांगलादेशचा डाव 49व्या षटकांत 222 धावांत गुंडाळला. सलामीच्या लिटन दासनं 117 चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांसह 121 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डेतलं हे पहिलं शतक ठरलं. लिटन दासनं मेहदी हसनच्या साथीनं 120 धावांची सलामी दिली. त्याच सलामीच्या भक्कम पायावर बांगलादेशला 222 धावांची मजल मारता आली. मेहदी हसननं 32 आणि सौम्या सरकारनं 33 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : 15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
IND vs NZ : अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, न्यूझीलंड विरुद्ध पॉवरप्लेमध्ये 118 धावा करत विक्रमाची नोंद, ऑस्ट्रेलियाला दणका देत विक्रम मोडला...
अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका
IND vs NZ 3rd T20 Highlights : अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
IND vs NZ 3rd T20 Score : अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली
अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Embed widget