एक्स्प्लोर
आशिष नेहरा 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु'च्या मुख्य प्रशिक्षकपदी
आयपीएलच्या पुढील मोसमासाठी संघ व्यवस्थापनाने आशिष नेहरावर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेहराची 'आयपीएल'च्या 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएलच्या गेल्या मोसमात गोलंदाज प्रशिक्षक असलेला नेहरा आता गॅरी कर्स्टनसह मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमात आरसीबीने डॅनियल व्हेटोरीच्या जागी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नेहराची नियुक्ती केली होती. पण येणाऱ्या मोसमासाठी संघ व्यवस्थापनाने नेहराकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद अशा पाच संघांकडून तो खेळला होता. अकराव्या मोसमात आरसीबीच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नेहराची वर्णी लागली.
नोव्हेंबर 2017 मध्ये नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आशिष नेहरा भारतीय क्रिकेट संघासाठी वनडे, कसोटी आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. त्याने 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं.
2011 मधील विश्वकप विजेत्या आणि 2003 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघात तो होता. दोन आशिया चषक आणि तीन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहराने चांगली कामगिरी बजावली होती. त्याने कारकीर्दीत 17 कसोटी, 120 वन डे आणि 27 टी-20 सामने खेळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
