एक्स्प्लोर

Fifa : फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार अर्जेंटिना, 63 हजार तिकिटांसाठी 15 लाख फॅन्सनी दिला अर्ज 

Argentina vs Panama : अर्जेंटीना फुटबॉल टीम गुरुवारी (23 मार्च) पनामा देशाविरुद्ध सामना खेळणार असून फॅन्समध्ये या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येत आहे. 

FIFA World Cup 2022 Champion : फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2023) जिंकल्यानंतर प्रथमच अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ मैदानात उतरणार आहे. पनामा देशाविरुद्ध हा सामना अर्जेंटिना खेळणार असून गुरुवारी (23 मार्च) हा जगज्जेता संघ अर्जेंटिनाचीच राजधानी ब्युनोस आयर्सच्या (Buenos Aires) 'द मोन्युमेंटल स्टेडियम'मध्ये पनामाविरुद्ध आमनेसामने असणार आहे. या सामन्यासाठी अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

ब्युनोस आयर्सच्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये 83 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. त्यात 20 हजार तिकिटं आरक्षित होती आणि 63 हजार तिकिटं फुटबॉल चाहत्यांसाठी उपलब्ध होती, मात्र 63 हजार सिटांसाठी तब्बल 15 लाख लोकांनी तिकीट खरेदीसाठी अर्ज केला आहे.  अर्जेंटिनामध्ये नेहमीच फुटबॉलची क्रेझ राहिली आहे. गेल्या वर्षी, अर्जेंटिना फिफा विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पावले टाकत असताना, येथे प्रत्येक सामन्यासोबतचा जल्लोष पाहण्यासारखा होता. फायनल जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या प्रत्येक शहरात लाखो लोक जल्लोष करताना दिसले. त्याच वेळी, अर्जेंटिना संघ ब्युनोस आयर्समध्ये विश्वचषक ट्रॉफीसह परेड काढत होता, तेव्हा या शहरातील रस्त्यावर 5 दशलक्ष लोक जमले होते.

तिकिटाचे दर 5 हजार ते 20 हजार होते

या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 60 डॉलर (5 हजार रुपये) ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, सर्वात महाग तिकिटाची किंमत 245 डॉलर (20 हजार रुपये) ठेवण्यात आली होती. मीडिया इंडस्ट्रीशी संबंधित लोकही सामना पाहण्यासाठी इतके उत्सुक होते की 344 पत्रकारांच्या क्षमतेच्या मीडिया बॉक्ससाठी 1.30 लाख अर्ज आले.

लिओनेल मेस्सीही मैदानात दिसणार 

अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांसाठी हा सामना खूप खास आहे. कारण जे लोक आपल्या संघाला कतारमध्ये चॅम्पियन होताना पाहू शकले नाहीत. त्यामुळेच चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी फार उत्सुकता आहे. या सामन्यात अर्जेंटिनाचे जवळपास तेच खेळाडू उतरवले जाऊ शकतात, जे फिफा विश्वचषक 2022 च्या संघाचा भाग होते. लिओनेल मेस्सीही हा सामना खेळताना दिसणार आहे.

रोमहर्षक होती फिफा विश्वचषकाची फायनल

फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.  

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Prichard Colon Death at 33 : 221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
Ind vs Sl 1st Test : भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget