All England Open Badminton : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत (All England Badminton Championship 2022) लक्ष्य सेन याने नुकताच उपांत्य फेरीत (Semi Final) प्रवेश मिळवला आहे. लक्ष्य सेन याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या एंडर्स एंटनसनला मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर आज (18 मार्च) तो कोर्टवर न उतरताच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे महिला दुहेरीमध्ये त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उलटफेर करत थेट सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पण पुरुष दुहेरीमध्ये  सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे स्पर्धेबाहेर गेले आहेत.


लक्ष्य सेनने उपांत्य पूर्व फेरीत जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या एंडर्स एंटनसनचा 21-16, 21-18 या फरकाने पराभव केला. त्यानंतर शुक्रवारी त्याचा प्रतिस्पर्धी लू गुआंग जू कोर्टावर उतरु न शकल्याने लक्ष्य थेट पुढील फेरीत पोहोचला. सेमीफायनलमध्ये त्याचा सामना मलेशियाच्या ली जिल जिया आणि जपानच्या केंटो मोमोटा यांच्यातील विजेत्या खेळाडूशी असेल.  दुसरीकडे त्रिशा-गायत्री महिला दुहेरीत दमदार कामगिरी केली. त्यांनी दक्षिण कोरियाच्या ली सोही आणि शिन सियुंगचान यांना 14-21, 22-20, 21-15 ने मात देत सेमीफायनल गाठली. 


सात्विक-चिराग मात्र बाहेर


 भारताचे सुपरस्टार खेळाडू सात्विकसाईराज आणि चिरागची जोडी जगातील नंबर एकची जोडी, इंडोनेशियाचे  मार्कस फर्नाल्डी गिडियन आणि केविन संजया सुकामुलजो यांच्याकडून 24-22, 21-17 अशा दोन सेट्समध्ये पराभूत झाले. ज्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. हा सामना जवळपास 47 मिनिटं चालला होता.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha