TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना Y दर्जाची सुरक्षा
सध्या द कश्मीर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांचे देखील अनेकांनी कौतुक केलं. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर काही या चित्रपटाला विरोध करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आता Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, विवेक यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही लोक धमक्या देत होते.
बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'पावनखिंड' ओटीटीवर
बॉक्स ऑफिसवर पावनखिंड या चित्रपटानं धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचं कौतुक केलं. सध्या अनेक निर्माते हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. पावनखिंड हा चित्रपट देखील आता ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. पावनखिंड हा चित्रपट 20 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने रिलीजच्या 7व्या दिवशी 18.05 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत दिली आहे.
अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा या रॉकेट हल्ल्यात मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर रॉकेटनं हल्ला करत आहे. यामध्ये अनेक युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनमधील अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ओक्साना या कीव्हमध्ये राहात होत्या. त्या राहात असलेल्या इमारतीवर रशियाच्या रॉकेटनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओक्साना यांचा मृत्यू झाला. त्या 67 वर्षाच्या होत्या. ओक्सानाच्या यंग थिएटर ग्रुपचा भाग होती. द हॉलिवूड रिपोर्टनुसार, युक्रेननं ओक्सानाला युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.
कुशल बद्रिकेची 'पुष्पा' स्टाईल होळी
होळी या सणाला होलिका दहन केले जाते. यावेळी लोक एकत्र येऊन होलिकेची पूजा करतात. त्यानंतर होलिका दहन केलं जातं. नुकताच अभिनेता कुशल बद्रिकेनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल त्याच्या कुटुंबासोबत होळी सेलिब्रेशन करताना दिसत आहे. कुशलनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आणि त्याचे कुटुंब पुष्पा द राइज या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची स्टेप करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कुशलनं कॅप्शन दिलं, 'या वर्षीपासून नवा बाल्या डान्स, सर्वांना होळीच्या शुभेच्छा'.
संबंधित बातम्या
Majhi Tujhi Reshimgath : बाबा म्हणून स्वीकार करायला परी घेणार यशचा इंटरव्ह्यू, होळीच्या रंगात रंगणार यश-नेहाचं प्रेम?
Shashi Kapoor : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha