एक्स्प्लोर

दुसऱ्या कसोटीतही उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संधी नाही?

टीम इंडिया 13 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी कसून सराव करत आहे.

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी टीम इंडियाला 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता टीम इंडिया 13 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी कसून सराव करत आहे. दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल केले जातील, हे सराव सत्र पाहून स्पष्ट दिसत आहे. कर्णधार विराट कोहली नेहमीच नव्या बदलांसह खेळण्यासाठी उतरतो. त्यामुळे या कसोटीतही असंच काहीसं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात सर्वात पहिली शक्यता सलामीवीर जोडीबाबत आहे. सलामीवीर केएल राहुलने मैदानात कसून सराव केला, ज्यावरुन अंदाज लावला जातोय की, राहुलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश केला जाईल. शिखर धवनच्या ऐवजी राहुलचा समावेश केला जाऊ शकतो आणि सलामीला मुरली विजय आणि राहुल येण्याची शक्यता आहे. मुरली विजय फॉर्मात नसला तरीही त्याचा अनुभव जास्त आहे. दुसरीकडे उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सराव सत्रातही प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा बाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. पहिल्या कसोटीतील फलंदाजांच्या अपयशानंतर रहाणेचा अंतिम अकरामध्ये समावेश केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात होता. असं झाल्यास एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावं लागेल, हार्दिक पंड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत आहे. सराव सत्रात रवींद्र जाडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा कसून सराव केला. ताप आल्यामुळे पहिल्या कसोटीला तो मुकला होता, ज्यामुळे आर. अश्विनला संधी देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : काळ्या ढगांनी ध्रुव जुरेलचं शतक अडवलं! 5 धावा बाकी असताना पावसाची एन्ट्री, कोलंबोत सामना थांबला, कधी होणार सुरू?
काळ्या ढगांनी ध्रुव जुरेलचं शतक अडवलं! 5 धावा बाकी असताना पावसाची एन्ट्री, कोलंबोत सामना थांबला, कधी होणार सुरू?
Ind Vs Sl 2nd Test Yashasvi Jaiswal : आधी श्रीलंकन खेळाडूला हेल्मेटने टक्कर दिली; नंतर यशस्वी जैस्वाल मैदानाबाहेर कुणाशी घेतला पंगा? पोस्ट सगळीकडे व्हायरल
आधी श्रीलंकन खेळाडूला हेल्मेटने टक्कर दिली; नंतर यशस्वी जैस्वाल मैदानाबाहेर कुणाशी घेतला पंगा? पोस्ट सगळीकडे व्हायरल
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
Ind Vs Sl 2nd Test Rishabh Pant : काल ज्याने हात सुजवला, आज त्यालाच ऋषभ पंतने धू धू धुतला; स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, श्रीलंकेचे खेळाडू बघत बसले, VIDEO
काल ज्याने हात सुजवला, आज त्यालाच ऋषभ पंतने धू धू धुतला; स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, श्रीलंकेचे खेळाडू बघत बसले, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
Sugar Rate: देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
Maharashtra Government: राज्यातील यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा करार
राज्यातील यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा करार
Embed widget