एक्स्प्लोर

झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे योगायोगांची मालिका

पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमवून 333 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने आधी फलंदाजी करुन तंतोतंत तितक्याच, म्हणजे 5 गडी गमवून 333 धावा केल्या.

शारजा :  क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. हातातोंडाशी आलेला अपेक्षित विजय कधी निसटून जातो, तर कधी हातून गेलेली मॅच ऐनवेळी जिंकली जाते. अशाच इंटरेस्टिंग घडमोडींमुळे हा जंटलमन्स गेम लोकप्रिय आहे. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत असाच एक इंटरेस्टिंग योगायोग घडला. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतला पहिला सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या अफगाणिस्तान संघाने जिंकला. 9 फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेवर 154 धावांनी मात केली. झिम्बाब्वेने या पराभवाचा वचपा काढला नसता, तरच नवल. मात्र योगायोगाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानचा पराभव करताना झिम्बाब्वेने एका रनचीही उधारी ठेवलेली नाही. म्हणजेच 11 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर 154 धावांनीच विजय मिळवला. हा योगायोग तर काहीच नाही. खरी मजा तर पुढे आहे... पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमवून 333 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने आधी फलंदाजी करुन तंतोतंत तितक्याच, म्हणजे 5 गडी गमवून 333 धावा केल्या. म्हणजेच दोन्ही वेळा संबंधित संघांसमोर सेम टार्गेट होतं. झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे योगायोगांची मालिका पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या 334 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 179 धावांवर ऑलआऊट झाला, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाव्बेच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघही सर्व गडी गमावून तितक्याच म्हणजे 179 धावांवर माघारी परतला. योगायोगांची मालिका इथेच संपली, असं तुम्हाला वाटत असेल, तर... नाही. दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून एक-एक शतक साजरं करण्यात आलं. पहिल्या सामन्यात अफगाणिस्‍तानसाठी रहमत शाहने 114 धावांची खेळी केली तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने 125 धावा ठोकल्या. दोन्ही सामन्यांमधील स्कोअरबोर्ड सारखंच होतं. पहिला सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर दुसरा झिम्बाब्वेने. क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारचा योगायोग दुर्मिळ मानला जात आहे. त्यामुळे हे सामने क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Embed widget