एक्स्प्लोर
‘रिओ’मध्ये अभिनव बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

नवी दिल्ली : बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णपदकविजेता नेमबाज अभिनव बिंद्राला रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून मान देण्यात आला आहे.
रिओ ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 5 ऑगस्टला संपन्न होणार आहे. या सोहळ्यात संचलनादरम्यान बिंद्रा भारतीय पथकाचं नेतृत्व करेल.
अभिनव बिंद्राच्या कारकीर्दीतलं हे पाचवं ऑलिम्पिक असून, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा बिंद्रा एकमेव भारतीय आहे. २००८ साली अभिनवनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवलं होतं.
अभिनव बिंद्रानं ऑलिम्पिकशिवाय जागतिक नेमबाजी, विश्वचषक नेमबाजी, एशियाड, कॉमनवेल्थ गेम्ससह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदकांची कमाई केली आहे.
२०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अभिनवच भारताचा ध्वजवाहक होता.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















