30th Senior Mumbai District Carrom Championship : सुट्ट्यांमध्ये तसंच फावल्या वेळात सर्वात प्रसिद्ध घरगुती खेळ म्हणजे कॅरम (Carrom). दरम्यान याच कॅरमच्या मोठमोठ्या स्पर्धा देखील पार पडत असून इंडियन ऑइल आणि भारतीय आयुर्विमा महामंडळतर्फे आयोजित 30 वी वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नुकतीच पार पडली. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल येथे ही स्पर्धा झाली. यावेळी पुरुष, महिला गटासह पुरुषांच्या वरिष्ट गटातील सामनेही पार पडले. यावेळी पुरुषांमध्ये महम्मद घुफ्रान, तर महिला गटात काजल कुमारीने विजय मिळवला असून पुरुषांच्या वयस्कर गटात संदेश अडसूळ विजयी झाले आहेत.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑईलचा महम्मद घुफ्रानने जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेंवर 3 सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत 12-16, 24-8 आणि 25-9 अशा फरकाने मात दिली. यावेळी पहिला सेट जरी योगेशने जिंकला असला तरी पुढील दोन्ही सेट दमदार फरकाने महम्मदने जिंकत विजय मिळवला. यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अनुभवी रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने नवोदित ए. के. फाऊंडेशनच्या ओंकार टिळकवर 25-8 आणि 202-05 असा सहज विजय मिळवला.
महिलांमध्ये काजल कुमारी विजयी
याशिवाय महिला गटातील सामन्यात इंडियन ऑईलची आंतरराष्ट्रीय दर्जाची कॅरमपटू काजल कुमारीने (kajal Kumari) रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरवर 20-7 आणि 21-2 असा एकतर्फी विजय मिळवला. महिलांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्या अंबिका हरिथने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वैभवी शेवाळीचा 20-10 आणि 25-11 च्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. दुसरीकडे पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात विजय कॅरम क्लबच्या संदेश अडसूळने त्यांच्याच क्लबच्या श्रीधर वाघमारेचा 4-18, 21-18 आणि 25-13 असा तीन सेटमधील दोन सेट जिंकत पराभव केला. तर तिसरं स्थान मुंबई महानगरपालिकेच्या शांतीलाल जितियाने सेंट्रल एक्साईजच्या सत्यनारायण दोंथूलाला 25-05 आणि 25-10 अशी मात देत मिळवलं.
हे देखील वाचा-
- ICC ODI Rankings : शिखरसह श्रेयसला वेस्ट इंडीजविरुद्ध खेळीचं फळ, आयसीसी क्रमवारीत झेप, वाचा टॉप 10 खेळाडूंची यादी
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार