एक्स्प्लोर

टीम इंडियाचं पुनरामन, पहिल्या दिवसअखेर द. आफ्रिका 269/6

सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.

सेन्चुरियन : रवीचंद्रन अश्विनची फिरकी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 धावांत रोखलं. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने एक विकेट घेतली. त्यानंतर हार्दीक पंड्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हाशिम आमलाला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर एडन मारक्रमने 15 चौकारांसह 94 धावांची खेळी उभारली. तर हाशिम आमलाने 82 धावांचं योगदान दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार फाफ ड्यू प्लेसी 24 आणि केशव महाराज 10 धावांवर खेळत होते. भारतीय संघात तीन बदल महत्त्वाचं म्हणजे या कसोटीसाठी भारताने तीन बदल केले आहेत. विकेटकीपर रिद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारऐवजी ईशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवनच्या जागी के एल राहुलचा समावेश करण्यात आला आहे. असं असलं तरी अजिंक्य रहाणेला या सामन्यातही बाहेरच बसावं लागलं आहे. टीम इंडियाला केपटाऊनच्या पहिल्याच कसोटीत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेतलं आव्हान जिवंत राखायचं तर टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. केपटाऊनच्या त्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी खरं तर दोन्ही डावांत कामगिरी फत्ते केली होती. पण फलंदाजांच्या हाराकिरीने टीम इंडियाला चौथ्या डावात अवघ्या 208 धावांचा पाठलागही झेपला नाही. केपटाऊनच्या त्या लाजिरवाण्या पराभवाचं शल्य उरात बाळगून, विराट कोहलीची टीम इंडिया आता सेंच्युरियनच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची गेल्या 25 वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेतली कामगिरी ही अजिबात गौरवास्पद नाही. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. उरलेली एकमेव कसोटी मालिका अनिर्णीत राहिली आहे. केपटाऊन कसोटीतला पराभव हा टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या 18 कसोटी सामन्यांमधला तब्बल नववा पराभव होता. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इराद्याने सेंच्युरियनच्या रणांगणावर उतरावं लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget