एक्स्प्लोर

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स? ICC नं दिलं स्पष्टीकरण

2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. 2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलनं (ICC) शुक्रवारी स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीच्या अॅंटी करप्शन यूनिट (ACU) चे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 2011 वर्ल्ड कप फायनल सामन्यात फिक्सिंग संबंधी असा एकही पुरावा मिळालेला नाही की ज्यामुळं सामन्याची चौकशी केली जावी. अॅलेक्स मार्शल यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला 2011 विश्वचषक फायनल सामन्याबाबत संशय घेण्यासारखं एकही कारण मिळालेलं नाही. या सामन्याबाबत फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर आयसीसी इंटीग्रिटी यूनिटने याबाबत चौकशी केली. मात्र या चौकशीत आमच्यासमोर एकही पुरावा आला नाही, की ज्याच्या आधारावर आम्ही हा सामना फिक्स होण्याच्या आरोपाचं समर्थन केलं जाऊ शकेल.' सामना फिक्स असल्याचा महिंदानंद अलुथगामगेंचा आरोप '2011 चा एकदिवसीय विश्वचषक जो भारताने जिंकला होता, तो फिक्स होता', असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केला होता. मंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी 2011 विश्वचषक फायनल फिक्स होती, असा आरोप केला होता. त्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाने आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीकडे या 'खोट्या' दाव्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. एका स्थानिक टिव्ही चॅनेलला मुलाखत देताना 2011 साली श्रीलंकेचे क्रीडा मंत्री असलेले अलुथगामगे यांनी म्हटलं होतं की, भारत आणि श्रीलंकामधील 2011 विश्वचषक फायनल फिक्स होता. आज मी तुम्हाला सांगतो की, आपण 2011 चा विश्वचषक विकला होता, मी क्रीडामंत्री असतानाही हे बोललो होतो, असा दावा त्यांनी केला होता. '2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स!', श्रीलंकन मंत्र्याचा आरोप, माजी कर्णधाराने केली चौकशीची मागणी यावर अरविंदा डी सिल्वा जे त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं होतं की, आपण लोकांना असत्यापासून प्रत्येकवेळी दूर करु शकत नाही. आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीने याची चौकशी करावी. त्यांनी म्हटलं आहे की, जसं आपण आपल्या विश्वचषक विजयाला साजरं केलं तसंच सचिन तेंडूलकर सारखा खेळाडू आपल्या जीवनातील या सुंदर आठवणींना साजरं करतो. मला वाटतं सचिन आणि भारताच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचं हे कर्तव्य आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. याप्रकारचे गंभीर आरोप अनेक गोष्टींवर परिणाम करतात. अशावेळी निवडकर्ते, खेळाडू, टीम व्यवस्थापन यावर परिणाम होतो. त्यामुळं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, हे खेळासाठी चांगलं राहील, असं अरविंदा डी सिल्वाने म्हटलं होतं. याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा महेला जयवर्धने यांनी देखील अलुथगामगे यांच्या दाव्याचं खंडण केलं होतं. 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शानदार शतकानं 275 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला मिळालं होतं. जे गौतम गंभीर (97) आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (91) जबरदस्त खेळीनं पार केलं होतं. 1983 नंतर दुसऱ्यांना टीम इंडियानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Embed widget