एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ख्रिस गेलच्या तुफानी खेळीने अनेक विक्रम मोडित
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112658/Chris-Gayle-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![सेंट जॉर्ज एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या डावात एकूण 24 षटकारांचा वर्षाव झाला. सोबतच एकदिवसीय सामन्यातील एका डावा संघाने लगावलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रमही इंग्लंडच्या नावे जमा झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 22 षटकार ठोकले. तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 षटकार ठोकले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112652/Chris-Gayle-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेंट जॉर्ज एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या डावात एकूण 24 षटकारांचा वर्षाव झाला. सोबतच एकदिवसीय सामन्यातील एका डावा संघाने लगावलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रमही इंग्लंडच्या नावे जमा झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 22 षटकार ठोकले. तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 षटकार ठोकले होते.
2/7
![418 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने 44 धावांवर आपले दोन फलंदाज गमावले. पण गेलचा प्रहार सुरुच होता. त्याने तिसऱ्या विकेटसाठी डॅरेन ब्राव्होसह (61धावा) 176 धावांची भागीदारी रचली, पण ती अपयशी ठरली. 295 धावसंख्येवर बाद होणारा गेल पाचवा फलंदाज होता. अखेरीस संपूर्ण संघ 389 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने हा सामना 29 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112647/Chris-Gayle-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
418 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने 44 धावांवर आपले दोन फलंदाज गमावले. पण गेलचा प्रहार सुरुच होता. त्याने तिसऱ्या विकेटसाठी डॅरेन ब्राव्होसह (61धावा) 176 धावांची भागीदारी रचली, पण ती अपयशी ठरली. 295 धावसंख्येवर बाद होणारा गेल पाचवा फलंदाज होता. अखेरीस संपूर्ण संघ 389 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने हा सामना 29 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
3/7
![पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या मुकाबल्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडच्या संघाने 6 बाद 418 धावा अशी डोंगराएवढी धावसंख्या केली. इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गनने (88 चेंडूंमध्ये 103 धावा) आणि यष्टीरक्षक जोस बटलरने (77 चेंडूंत 150 धावा) शतकं ठोकली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112642/Chris-Gayle-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या मुकाबल्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडच्या संघाने 6 बाद 418 धावा अशी डोंगराएवढी धावसंख्या केली. इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गनने (88 चेंडूंमध्ये 103 धावा) आणि यष्टीरक्षक जोस बटलरने (77 चेंडूंत 150 धावा) शतकं ठोकली.
4/7
![ख्रिस गेलने 85 चेंडूत आपल्या 150 धावा पूर्ण केल्या. संघ पराभवाच्या छायेत असताना एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद दीडशे धावा करण्याचा विक्रम गेलने केला. त्याने रिकी पॉण्टिंगला मागे टाकलं, पॉण्टिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये 99 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112632/Chris-Gayle-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ख्रिस गेलने 85 चेंडूत आपल्या 150 धावा पूर्ण केल्या. संघ पराभवाच्या छायेत असताना एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद दीडशे धावा करण्याचा विक्रम गेलने केला. त्याने रिकी पॉण्टिंगला मागे टाकलं, पॉण्टिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये 99 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला होता.
5/7
![यासोबतच ख्रिस गेलने (10,074 धावा) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या दहा हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकीर्दीत ब्रायन लारानंतर (10, 405) दहा हजार धावांचा आकडा पार करणारा वेस्ट इंडिजचा दुसरा कॅरेबियन फलंदाज ठरला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांबाबत बोलायचं झालं तर दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो चौदावा फलंदाज ठरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112627/Chris-Gayle-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच ख्रिस गेलने (10,074 धावा) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या दहा हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकीर्दीत ब्रायन लारानंतर (10, 405) दहा हजार धावांचा आकडा पार करणारा वेस्ट इंडिजचा दुसरा कॅरेबियन फलंदाज ठरला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांबाबत बोलायचं झालं तर दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो चौदावा फलंदाज ठरला आहे.
6/7
![39 वर्षीय गेलने 97 चेंडूंमध्ये 162 (14 षटकार, 11 चौकार) धावांची जबरदस्त खेळी केली. एकदिवसीय कारकीर्दीत 25व्या शतकी खेळीत गेलने सामन्यातील आठवा षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी+एकदिवसीय+ट्वेन्टी 20 आंतरराष्ट्रीय) 500 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करणारा पहिला फलंदाज बनला. गेलने आतापर्यंत कसोटीमध्ये 98, एकदिवसीय सामन्यात 305 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112621/Chris-Gayle-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
39 वर्षीय गेलने 97 चेंडूंमध्ये 162 (14 षटकार, 11 चौकार) धावांची जबरदस्त खेळी केली. एकदिवसीय कारकीर्दीत 25व्या शतकी खेळीत गेलने सामन्यातील आठवा षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी+एकदिवसीय+ट्वेन्टी 20 आंतरराष्ट्रीय) 500 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करणारा पहिला फलंदाज बनला. गेलने आतापर्यंत कसोटीमध्ये 98, एकदिवसीय सामन्यात 305 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.
7/7
![वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरुच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली. मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही, आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/28112616/Chris-Gayle-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरुच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली. मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही, आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला.
Published at : 28 Feb 2019 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion