एक्स्प्लोर
सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये बॉलिवूड स्टार कितव्या स्थानावर?

1/6

या यादीत आठव्या स्थानी शाहरूख खान असून, त्याने या वर्षी 3.3 कोटी डॉलर मानधन घेतले. याच स्थानी त्याच्यासोबत अयर्न मॅन डाउनी ज्यूनिअर हाही आहे. शाहरूखच्या संदर्भात लिहताना फोर्ब्सने बॉलिवूड आणि बॉक्स ऑफिसवर आपली बादशाही शाहरूखने कायम राखल्याचे म्हणले आहे. शाहरूखने अनेक ब्रॉण्डच्या माध्यमातूनही कमाई होते.
2/6

दबंग सलमान खानने वांद्रेच्या नॅशनल कॉलेजमधून शिक्षणाची सुरुवात केली. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शिक्षण अर्ध्यातच सोडलं.
3/6

टॉप 20 अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानी ड्वेन जॉनसन (द रॉक), दुसऱ्या स्थानी जॅकी चेन, तिसऱ्या स्थानी, मॅट डेमोन, चौथ्या स्थानी टॉम क्रूज, पाचव्या स्थानी जॉनी डेप, सहाव्या स्थानी बेन एफ्लेक, सातव्या स्थानी विन डीजल आठव्या स्थानी अनुक्रमे शाहरूख खान आणि रॉबर्ट डाउनी दहाव्या स्थानी अक्षय कुमार आणि ब्रॅण्ड पिट बाराव्या स्थानी अॅडम सॅड्लर आणि मार्क वाह्लबर्ग, चौदाव्या स्थानी सलमान खान, पंधराव्या स्थानी लियोनार्डो डिकैप्रियो, सोळाव्या स्थानी क्रिस प्रॅट, सतराव्या स्थानी विल स्मिथ, आठराव्या स्थानी अमिताभ बच्चन, एकोणिसाव्या स्थानी मॅथ्यू मॅक्कनॉगी आणि विसाव्या स्थानी हॅरिसन फोर्ड यांचा क्रमांक आहे.
4/6

या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव 18 व्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन कोटी डॉलर्सची कमाई केली. फोर्ब्सने अमिताभ बच्चन यांचा गौरव करताना 73 वर्षीय अभिनेते आजही कामात व्यस्त असतात, असे म्हणले आहे. तसेच त्यांनी गेल्या पाच दशकांत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवताना 150 पेक्षा जास्त चित्रपटांत प्रमुख भूमिका निभावल्याचेही सांगितले.
5/6

‘रुस्तम’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड कायम आहे. 'रुस्तम'ने आतापर्यंत 124 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करताच अक्षयच्या नावावर नवा विक्रम झाला आहे.
6/6

फोर्ब्स मासिकाने 2016 मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या जगातील टॉप 20 अभिनेत्यांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, बीग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे. या यादीत WWE स्टार ड्वेन जॉनसन म्हणजे 'द रॉक' अव्वल स्थानी आहे.
Published at : 26 Aug 2016 07:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
