एक्स्प्लोर
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचा अर्धशतकांचा विश्वविक्रम!
1/10

दिप्ती शर्मा 3, शिखा पांडे 2 आणि पूनम यादवने घेतलेल्या एका विकेटच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना स्वस्तात रोखता आलं. इंग्लंडचा अख्खा संघ केवळ 246 धावांचीच मजल मारु शकला.
2/10

भारताने इंग्लंड महिला संघाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाज 246 धावांमध्येच गारद झाल्या.
3/10

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली. इंग्लंडवर 35 धावांनी मात करुन कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाने दणदणीत विजय साजरा केला.
4/10

विराटच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये एकूण 27 शतकं आहेत.
5/10

दुसरीकडे मिताली राजने 178 सामन्यांमध्येच 47 अर्धशतकं पूर्ण केले आहेत. तर तिच्या नावावर 5 शतकांचाही समावेश आहे.
6/10

विराटने आतापर्यंत खेळलेल्या 185 वन डे सामन्यात 42 अर्धशतक केले आहेत.
7/10

अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत मिताली राज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्याही पुढे आहे.
8/10

वन डे क्रिकेटमध्ये 47 अर्धशतक ठोकणारी मिताली राज पहिलीच महिला क्रिकेटर बनली आहे.
9/10

मिताली राजने चारलेट एडवर्ड्सला मागे टाकत वन डे कारकिर्दीतलं 47 वं अर्धशतक पूर्ण केलं. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सध्या मिताली राजच्या नावावर आहे.
10/10

या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने अर्धशतक ठोकून सलग 7 अर्धशतक ठोकण्याचा विश्व विक्रम केला. यासोबतच तिने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Published at : 25 Jun 2017 11:51 PM (IST)
View More























