सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेतून शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे. त्यामुळे हे आंदोलन लवकरच मागे घेतलं जाईल. शेतकऱ्यांच्या जवळपास 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाला दिली.
5/8
वनजमिनीबाबत येत्या 6 महिन्यात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी मंत्र्यांच्या समितीची स्थापना करण्यात येईल. ही समिती त्याबाबत पाठपुरावा करेल, ही मुख्य मागणी शेतकऱ्यांची होती.
6/8
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे. खरंतर आज सकाळी ठाण्याहून मोर्चा मुंबईकडे निघणार होता, मात्र दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठलं.
7/8
रक्ताळलेले पाय घेऊन 200 किलोमीटरची पायपीट केलेला बळीराजा अखेर आझाद मैदानावर धडकला. विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज पहाटे आझाद मैदानात दाखल झाला.
8/8
तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.