नेव्हिले मेडझिव्हाः झिम्बाब्वेसोबत नुकत्याच झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मेडझिव्हाने अत्यंत भेदक मारा केला, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली होती.
2/6
लसिथ मलिंगाः श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20 विश्वचषक 2014 च्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 130 केल्या होत्या. धोनीने या सामन्यात मलिंगाच्या शेवटच्या षटकात 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा केल्या होत्या.
3/6
कॅगिसो रबाडाः दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या सामन्यात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची गरज होती, मात्र रबाडासमोर धोनीची जादू न चालल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
4/6
जेम्स फ्रँकलिनः न्यूझीलंडने 2012 मध्ये झालेल्या ट्वेंटी सामन्यात भारताचा एका धावाने पराभव केला होता. या सामन्यानंतर धोनीला टिकेचा सामना करावा लागला होता. शेवटच्या षटकात धोनी फ्रँकलिनच्या गोलंदाजीवर मोठा फटका न मारु शकल्यामुळे हा पराभव झाला होता.
5/6
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला जगातील सर्वोत्कृष्ट फिनीशर म्हणून ओळखलं जातं. मात्र धोनीला शेवटच्या षटकांत रोखणारे सुद्धा काही गोलंदाज आहेत, ज्यांची गोलंदाजी धोनीचा वीक पॉईंट आहे.
6/6
आशिष नेहराः आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज आशिष नेहराने एका सामन्यात धोनीच्या पुणे संघाचा विजय खेचून आणला होता. पुण्याला विजयासाठी 14 धावा लागत असताना नेहराने शेवटच्या षटकात गोलंदाजी केली होती.