पंजाबने अकरा चेंडू आणि नऊ विकेट्स राखून हे आव्हान पार केलं. पंजाबच्या लोकेश राहुलने 27 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 60 धावांची खेळी केली.
2/10
ख्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शतकी सलामीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकात्याचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. पंजाबचा हा आयपीएलमधला चौथा विजय ठरला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पंजाबला 13 षटकांत 125 धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं.
3/10
यासोबतच गेलने तीन सामन्यांमध्ये 229 धावा करत ऑरेंज कॅपचाही मान मिळवला.
4/10
ख्रिस गेल या आयपीएल मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे.
5/10
गेलने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 21 षटकार ठोकले आहेत.
6/10
गेलने यासोबतच या आयपीएल मोसमातला सर्वात मोठा विक्रमही मोडला.
7/10
या आयपीएल मोसमाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या गेलने त्याच्या खेळीने सर्वांची बोलती बंद केली आहे.
8/10
गेलने 38 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 60 धावा फटकावल्या. त्या दोघांनी 116 धावांची सलामी दिली. त्याआधी ख्रिस लिनच्या अर्धशतकाने कोलकात्याला सात बाद 191 धावांची मजल मारुन दिली होती.
9/10
आंद्रे रसेलच्या नावावर आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये 19 षटकार आहेत.
10/10
गेलपूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या नावावर होता.