कित्येक वर्षात ऊन वारा, पावासामुळे या शिळावर शेवाळ माती, चिखल साचून, अंतिम घटका मोजत होती. आज किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे शिळा बाहेर काढून तिला स्वच्छ करण्यात आलं.
2/5
वसईच्या शिलाहारकालीन इतिहासाला आता नव्याने साद घालण्यात आली असून, नव्या शिलालेखाच्या पाऊलखुणा ही यामुळे उजेडात आल्या आहेत. ही शिळा कित्येक वर्षापासून दुर्लक्षितत होती.
3/5
वसईच्या प्राचीन पेशवेकालीन श्री सिध्देश्वर महादेव मंदिरा शेजारी सन 800 ते 1265 दरम्यानच्या शिलाहार राजवटीतील प्राचीन गद्धेगाळ म्हणजेच स्मारक शिला सापडली आहे.
4/5
किल्ले वसई मोहीम परिवाराने ही वास्तू शोधून काढली आहे. त्यामुळे वसईच्या ऐतिहासिक संदर्भात आता आणखीन भर पडली आहे.
5/5
चार फुट ही शिळा असून, शिळाच्या वरती मंगलकलश, त्यानंतर देवणागीरी, जुनी मराठीच्या तीन ओळी त्यानंतर शैवपंथाची कोरीव शिवलिंग, त्यानंतर पुन्हा तीन ओळीची जुनी मराठी शब्द, आणि त्यानंतर अस्पष्ट असं गध्येगाळ दिसतं आहे. ही शिळा जवळपास हजार वर्ष जुनी आहे.