डॉ. विठ्ठल वाघ.. मराठी साहित्याच्या प्रांतातलं मोठं नाव. 'काया मातीत मातीत तिफन चालते' या त्यांच्या कवितेनं मराठी मनावर अक्षरश: कायमचं गारूड घातलं आहे.
2/9
'वाघामुळं जंगलाला शोभा येते', असं म्हटलं जातं. साहित्यातल्या या वाघामुळे ओसाड जागेची 'बाग' झालेल्या या जागेलाही शोभा आली होती.
3/9
पुढे त्यांनी बागेच्या भिंतींना रंगरंगोटी सुरू केली. अन् हळू-हळू या बगिच्याच्या भिंती 'बोलायला' लागल्यात.
4/9
ही ओसाड जागा डॉ. वाघांच्या घरापासून अगदी काही पावलांवर. मार्च महिन्यात सकाळ-संध्याकाळ वाघांनी येथे काम करायला सुरूवात केली.
5/9
डॉ. विठ्ठल वाघांच्या समर्थ लेखणीतून आलेल्या अशा अनेक कवितांनी शेतकऱ्यांच्या दु:खाला बोलतं केलं आहे. म्हणूनच त्यांना मराठी साहित्य वर्तुळात 'महाराष्ट्राचं लोककवी' म्हटलं जातं.
6/9
विठ्ठल वाघांच्या श्रमप्रतिष्ठेतून हा कायापालट झाला होता.
7/9
आधी येथील काटेरी झाड-झुडपं साफ केली. मोठ्या झाडांभोवती आकर्षक पद्धतीनं दगड रचलेत. प्रत्येक दिवस ही ओसाड जागा नवं रूप घेऊन समोर येत होती.
8/9
डॉ. वाघांना हे चित्रं तेथून येता-जाता पार अस्वस्थ करायचं. ती जागा स्वच्छ झाली पाहिजे. तिथे सुंदर झाडं आणि फुलांचा बगिचा फुलला पाहिजे, असं त्यांना नेहमी मनोमन वाटायचं.
9/9
लॉकडाऊनच्या काळात डॉ. वाघांच्या हातून एक असंच मोठं सृजनात्मक काम उभं राहीलं आहे. मात्र, हे काम त्यांच्यातील साहित्यिकापेक्षा त्यांची फार वेगळी ओळख सांगणारं आहे.